Breaking News

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रूग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सगळ्या घडामोडीत मुंबईतील शेअर बाजार सकाळी सुरु झाला. बाजार सुरु होताच स्टील उद्योग, किरकोळ बाजार, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या मागणींत वाढ झाली. त्यामुळे सातत्याने त्यात वाढच होत राहिली. त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात २१ हजार ६७५४.७५ या नव्या उच्चांकावर पोहोचला.

शेअर बाजाराच्या ४ थ्या सत्रात बाजाराच्या निर्देशांत ७०१.६३ ने किंवा ०.९६ इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेअरबाजार बंद होताना तो सर्वाधिक उच्चांकावर ७२,०३८ या उच्चांकार पोहोचला. वास्तविक पाहता दिवसभरात मुंबई शेअर बाजारातील एकूण ट्रेंड पाहता निर्देशांकात ७८३ किंवा ०.१ टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून येते.

आंतरराष्ट्रीयस्तरावर स्तरावरील आशादायक परिस्थितीचा फायदा निफ्टी मधील गुंतवणूकदारांनी झाल्याचे दिसून आले. निफ्टी बाझाराच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून आले असून २१३ किंवा १.०९ टक्के इतकी वाढ झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे निफ्टी बाझार दिवसभरात २१ हजार ६५४ वर पोहोचला. तर दिवसभरात त्याच पुन्हा वाढ होत २३४ किंवा १.०९ इतकी निर्देशांकात वाढ होत २१ हजार ६७५ या उच्चांकावर दिवसअखेर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात अल्ट्रा टेक सिमेंट, जेएसडब्लू, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अॅड टूर्बो, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सच्या शअर बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आणि दर चढ्या स्वरूपाचे असल्याने या कंपन्यांना फायदा झाला. या कंपन्यांबरोबर एनटीपीसी, टेक महिंद्राचे शेअर्स मागे पडल्याचे दिसून आले.

Check Also

सात महिन्यातील कच्चे तेल एकट्या एप्रिल महिन्यात रशियाकडून आयात ७ महिन्यातील उच्चांक ठरावा इतके कच्च्या तेलाची आयात

खाजगी रिफायनर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि Rosneft-समर्थित Nayara Energy यांनी एप्रिल २०२४ मध्ये रशियाकडून सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *