Breaking News

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम

भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्‍टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत असलेल्या या ६ शेअर्सबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
एसबीआयचे शेअर्स गेल्या १० वर्षांत ९ वेळा ऑक्टोबर महिन्यात सरासरी ८.७ टक्के वाढले आहेत. या वर्षात आतापर्यंत एसबीआयचे शेअर्स सुमारे २.२५ टक्क्यांनी घसरले आहेत.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सने १० वर्षांत दरवर्षी ऑक्टोबरमध्ये सरासरी ११.५ टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स यंदा ५.६ टक्क्यांनी वधारले आहेत.

एनएमडीसी
एनएमडीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने गेल्या १० वर्षात ९ वेळा ऑक्टोबर महिन्यात त्याचा सरासरी परतावा ९.४ टक्के दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून एनएमडीसीचे शेअर्स १७.४९ टक्क्यांनी वाढले आहेत.

मणप्पुरम फायनान्स
मणप्पुरम फायनान्सच्या शेअर्सने १० वर्षांत ९ वेळा ऑक्टोबरमध्ये सरासरी ९.४ टक्के परतावा दिला आहे. हा शेअर्स या वर्षी आतापर्यंत २६ टक्क्यांनी वाढला आहे.

जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर
जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर्स ऑक्टोबर महिन्यात १० वर्षात ९ वेळा वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरने सरासरी ८.६ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी देखील शेअर्स आतापर्यंत ४६.३८ टक्के वाढला आहे.

सेल
सेल म्हणजे भारतीय पोलाद प्राधिकरणचे शेअर्स गेल्या १० वर्षांपैकी ९ वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात वाढले आहेत. या कालावधीत या शेअर्सने सरासरी ११.४ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत सेलचे शेअर्स ५.५६ टक्के वाढले आहेत.

Check Also

वॉरबर्ग पिंकसने विकत घेतली श्रीराम हाऊसिंग कंपनी ४ हजार ६३० कोटी रूपयांना झाला व्यवहार

न्यूयॉर्क स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) ला इक्विटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *