Breaking News

पीएम किसानसाठी ई-केवायसी अनिवार्य अन्यथा मिळणार नाही लाभ

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्याची देशातील कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, शेतकऱ्या्ंनी पीएम किसानसाठी अद्याप ई-केवायसी केले नसेल तर त्यांचा १५ वा हप्ता अडकू शकतो. ई-केवायसी केली नसल्याने या आधी अनेक शेतकऱ्यांचे चौदाव्या हप्त्याचे पैसे अडकले होते. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसी केले नाही तर सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवणार नाही.

पीएम किसान योजनेचा लाभ अनेक अपात्र लोकही घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यामुळे सरकारने योजनेतील फसवणूक थांबवण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत. यामध्ये ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. हे काम शेतकरी आपल्या स्मार्टफोनचा वापर करून काही मिनिटांत घरी बसून करू शकतात. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊनही ई-केवायसी करता येते. तसेच तुम्ही पीएम किसान पोर्टलवर ओटीपी आधारित ई-केवायसी करू शकता.

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

1 – पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.pmkisan.gov.in.

2 – त्यानंतर होम स्क्रीनवर ‘E-kyc’ पर्यायावर क्लिक करा.

3 – आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.

4 – आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी मिळेल.

5 – ‘Get OTP’ वर क्लिक करा.

6 – ओटीपी भरा आणि एंटर दाबा.

7 – eKYC प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

कॉमन सर्व्हिस सेंटर

शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन बायोमेट्रिक पद्धतीने eKYC करू शकतात. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये या कामासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक देखील आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर eKYC साठी १७ रुपये शुल्क आहे.

Check Also

एसआयपी माध्यमातून गुंतवणूकीचा विचार करताय? हे ७ प्रकार माहित आहेत का आर्थिक गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशातील गुंतवणूकदारांकडून एसआयपी SIP अर्थात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गुंतवणूकीच्या पर्यायाचा वापर केला जात आहे. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *