Breaking News

स्वस्तात गृहकर्ज हवंय? या ५ बँकांचे दर पहा

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते, परंतु आजच्या काळात घर घेणे इतके सोपे नाही. यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कावर गृहकर्ज देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या बँका ३० लाख रुपयांच्या घरावर २० वर्षांच्या कालावधीत सर्वात कमी व्याजदर देत आहेत.

1) युनियन बँक ऑफ इंडिया
ही बँक आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर ८.४० ते १०.८० टक्के व्याजदर आकारत आहे. प्रक्रिया शुल्क एकूण रकमेच्या ०.५० टक्के किंवा कमाल १५,००० रुपये घेतले जाऊ शकते.

2) इंडियन बँक
इंडियन बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर ८.४५ टक्के ते १०.२० टक्के आहे. बँक कर्जाच्या रकमेच्या ०.२५ टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

3) बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा ३० लाख रुपयांच्या गृहकर्जावर ८.४० टक्के ते १०.६० टक्के व्याजदर देत आहे. बँक कर्जाच्या रकमेच्या ०.५० टक्के पर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्क आकारत आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया

4) युको बँक
तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसाठी युको बँकेकडून ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला ८.४५ ते १२.६० टक्के व्याज द्यावे लागेल. प्रोसेसिंग फी १,५०० ते १५,००० रुपये भरावे लागतील.

5) आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँक गृहकर्जावर ८.४५ ते १२.२५ टक्के व्याजदर आकारत आहे. त्याच वेळी, ग्राहकांना प्रक्रिया शुल्क म्हणून ५,००० ते १५,००० रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागेल.

Check Also

देशाच्या जीएसटी वसुलीत १२.४ टक्क्याने वाढ; दोन लाख कोटींचा टप्पा पार

सबंध देशभरात लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आणि सर्वच लहान-मोठ्या राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *