Breaking News

शेअर बाजारात गुंचवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी खिशात पैसे ठेवा, या आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सहा आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आताच पैशांची व्यवस्था करा.

चावडा इन्फ्रा आयपीओ
गुजरातस्थित चावडा इन्फ्राचा आयपीओ १२ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. तर आयपीओ १४ सप्टेंबर रोजी बंद होईल. कंपनीने ६०-६५ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओमध्ये ६६.५६ लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. कंपनीने मार्केट मेकर्ससाठी ३.३६ लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत.

कुंदन एडिफिस आयपीओ
कुंदन एडिफिस कंपनीचा आयपीओ १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत खुला असेल. आयपीओ मध्ये प्रति शेअर्स दर ९१ रुपये आहे. तर लॉट साइज १२०० शेअर्स आहे. आयपीओचा आकार २५.२२ कोटी रुपये आहे.

आरआर काबेल आयपीओ
इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीआरआर काबेलचा आयपीओ १३ सप्टेंबरला उघडेल. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओसाठी ९८३-१०३५ रुपयांचा प्राइस बँड आहे. हा आयपीओ १२ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. गुंतवणूकदार १४ शेअर्सच्या लॉटमध्ये पैसे गुंतवू शकतील. कंपनी २६ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल.

सामी हॉटेल्स आयपीओ
सामी हॉटेल्स आयपीओ १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरपर्यंत खुला असेल. आयपीओमध्ये १२०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. तसेच ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत तीन भागधारकांद्वारे १.३५ कोटी शेअर्स विकले जातील. इक्विटी इंटरनॅशनल फंड व्ही च्या मालकीची सिंगापूरस्थित ब्लू चंद्र पीटीई लिमिटेड ओएफएसमध्ये ८४.२८ लाख शेअर्स विकणार आहे. तर गोल्डमन सॅक्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज (एशिया) ४९.३१ लाख शेअर्स आणि GTI कॅपिटल अल्फा १.४ लाख शेअर्सची विक्री करेल.

जैगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आयपीओ
जैगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेसचा आयपीओ १४ सप्टेंबर रोजी उघडणार आहे.
कंपनीने अद्याप किंमत बँड जाहीर केलेली नाही. शेअर्सचे वाटप २२ सप्टेंबर रोजी आणि परतावा २५ सप्टेंबर रोजी दिला जाईल. तर २६ सप्टेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. शेअर्सचे लिस्टिंग २७ सप्टेंबर रोजी होईल.

सेलीकॉर गॅझेट्स
दिल्लीस्थित गॅझेट विक्री कंपनी सेलीकॉर गॅझेट्सचा आयपीओ १५ सप्टेंबरला उघडणार आहे. आयपीओतून कंपनी ५१ कोटी रुपये उभारणार आहे. शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर रोजी केले जाईल. तर २७ सप्टेंबर रोजी शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. रिफंडची प्रक्रिया २६ सप्टेंबरपासून सुरू होईल.

Check Also

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *