Breaking News

शेअर बाजारातील तेजीचा परिणाम ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

शेअर बाजारात सुरू असलेल्या जबरदस्त वाढीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने ऑगस्ट २०२३ मध्ये २०,२४५ कोटी रुपयांचा पाच महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसपीआयद्वारे केलेली गुंतवणूक ऑगस्टमध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. एसपीआयद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण १५,८१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने डेटा जारी केला आहे. यानुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये २०,२४५.२६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर जुलै २०२३ मध्ये केवळ ७६२५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. एसपीआयच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. एसपीआयद्वारे ऑगस्ट महिन्यात विक्रमी १५,८१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. जुलैमध्ये हा आकडा १५,२४३ कोटी रुपये होता.

शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये जबरदस्त खरेदी दिसून येत आहे. त्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. म्युच्युअल फंडांच्या स्मॉल कॅप, मिड कॅप योजनांमध्येही ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. ऑगस्टमध्ये स्मॉल कॅप फंडांमध्ये ४२६५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, जी जुलैमध्ये ४१७१ कोटी रुपये होती. तर मिड कॅप फंडांमध्ये २५१२ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. जुलैमध्ये ही गुंतवणूक केवळ १६२३ कोटी रुपये होती.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांच्या डेब्ट योजनांमधून २५,८७२ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. तर एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये १८९३ कोटी रुपयांचे काढले गेले. हा आकडा जुलैमध्ये केवळ ३५३ कोटी रुपये होता. नवीन फंड ऑफरद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये ७३४३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. तर जुलैमध्ये नवीन फंड ऑफरद्वारे ६७२३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *