Breaking News

पेन्शनधारकांनी हे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक अन्यथा मिळणार नाही पेन्शन

सरकारी निवृत्तीवेतन मिळणाऱ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. पेन्शनधारकांना आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट उपलब्ध आहे. म्हणजेच ते आता घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना सादर करता येणार आहे.

पेन्शनधारक आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र सहा वेगवेगळ्या प्रकारे सादर करू शकतो. पेन्शन ज्या बँकेत जमा होते तिथे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तुम्ही सरकारच्या वेबसाइटवरही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तेथून सर्व सरकारी एजन्सी तुमच्या जीवन प्रमाणपत्रात प्रवेश करू शकतात.

भारत सरकारने पेन्शनधारकांसाठी आधार आधारित डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सेवा सुरू केली आहे. निवृत्तीवेतनधारक त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर पेन्शन माहिती त्यांच्या जीवन प्रमाणपत्राची बायोमेट्रिक पडताळणी करण्यासाठी वापरू शकतात. पेन्शनधारक आफल्या जवळील सेवा केंद्र, बँक शाखा किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊनही जीवन प्रमाणपत्र देऊ शकता.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे पर्याय

– जीवन प्रमाण पोर्टलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

– चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

– पोस्टमनच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

– इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

– निवृत्तीवेतनधारक नियुक्त अधिकार्‍याने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र सादर करू शकतात.

– पेन्शनधारक डोअरस्टेप बँकिंगद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

Check Also

अॅक्सिस बँकेतून ही कंपनी बाहेर पडणार नवीन ब्लॉक डिल करण्याच्या विचारात

ॲक्सिस बँकेत मोठ्या धमाकेदार प्रवेशानंतर सहा वर्षांहून अधिक काळ, बेन कॅपिटल खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यातून पूर्णपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *