Breaking News

शेअर बाजार तेजीत सेन्सेक्स : २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद

जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारातही तेजी दिसून आली. आयटी आणि कमोडिटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअर बाजार वधारून बंद झाले. सेन्सेक्स २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांनी वाढून १९,५२८ वर स्थिरावला.

सेन्सेक्सध्ये कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६४ टक्के वाढ झाली आहे. तर एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आदी शेअर्सने तेजी नोंदवली. महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, अॅक्सिस बँक, नेस्ले, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरले.

शेअर बाजारात सोमवारी सुरुवातीच्या वाढीनंतर सर्व नफा सुरुवातीच्या तासांमध्ये गमावला आणि बाजार नकारात्मक झोनमध्ये आला. मात्र, दुपारी पुन्हा खरेदी केल्याने निफ्टीला वाढण्यास मदत झाली आणि तो दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपने बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली आणि जवळपास एक टक्क्याने वाढून ५२ आठवड्यांच्या सर्वकालीन उच्चांकांना स्पर्श केला.

दरम्यान, बीएसईने जिओ फायनान्शियल सर्व्हिसच्या शेअर्सची सर्किट लिमिट ५ टक्क्यावरून २० टक्के केली आहे. याचा अर्थ आता कंपनीच्या शेअर्समधील लोअर किंवा अप्पर सर्किट ५ टक्क्याऐवजी २० टक्के असेल. आज जिओ फायनान्शियल सर्व्हिसचे शेअर्स ३.८८ टक्के वाढले आहेत.

याआधी शुक्रवारी (१ सप्टेंबर) शेअर बाजारात वाढ झाली होती. सेन्सेक्स ५५५ अंकांच्या वाढीसह ६५,३८७ वर बंद झाला. तर, निफ्टी १८१ अंकांने वधारून १९,४३५ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २६ शेअर्समध्ये वाढ आणि ४ शेअर्समध्ये घसरण झाली.

Check Also

पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय नॉन फूड्स प्रकल्प खरेदी करण्याचा निर्णय

पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *