Breaking News

एम एस धोनीला बनला या बँकेचाही ब्रँड अॅम्बेसेडर आता बँकेच्या प्रत्येक मोहिमेत चेहरा दिसणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रविवारी क्रिकेट दिग्गज महेंद्रसिंग अर्थात एम एस धोनीची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली. याबाबत बँकेकडून निवेदन देण्यात आले आहे की, आता बँकेच्या सर्व प्रमोशनमध्ये धोनीचे महत्त्वपूर्ण योगदान असेल.

बॅंकेने आपल्या निवेदनात म्हटले की, धोनीमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत संयम राखण्याची क्षमता तसेच दबावाखाली स्पष्ट विचार करण्याची क्षमता आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता आहे. या क्षमतेबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. महेंद्रसिंग धोनी हा ब्रँड अॅम्बेसेडर बनणे हा एसबीआयसाठी एक आदर्श पर्याय आहे.

बँकेने म्हटले की बँक आणि धोनी यांच्यातील संबंध आता विश्वासार्हता आणि नेतृत्वाची मूल्ये प्रतिबिंबित करतात. त्याच वेळी, हे एसबीआय ग्राहकांशी सखोल संबंध निर्माण करण्याच्या बँकेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, एक समाधानी ग्राहक म्हणून धोनीचा एसबीआयसोबतचा संबंध त्याला आमच्या ब्रँडचा एक परिपूर्ण अवतार बनवतो. या भागीदारीद्वारे आम्ही विश्वास, सचोटी आणि अतूट समर्पणाने राष्ट्र आणि आमच्या ग्राहकांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे.

Check Also

एसआयपी माध्यमातून गुंतवणूकीचा विचार करताय? हे ७ प्रकार माहित आहेत का आर्थिक गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशातील गुंतवणूकदारांकडून एसआयपी SIP अर्थात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गुंतवणूकीच्या पर्यायाचा वापर केला जात आहे. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *