Breaking News

कोणती गुंतवणूक फायद्याची? महिला सन्मान बचत की सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या महिला आणि मुलींसाठी योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष बचत योजना जाहीर केली होती. ही योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. ही एक छोटी बचत योजना आहे, जी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. अशा स्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कोणती योजना अधिक चांगली आहे, असा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात निर्माण होतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही विशेषत: महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दोन वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेंतर्गत किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार ७.५ टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाते. यासोबतच पहिल्या वर्षानंतर खातेदाराला ४० टक्के रक्कम काढण्याची सुविधा मिळते. तुम्ही ऑक्टोबर २०२३ मध्ये MSSC खाते उघडल्यास, तुमचे खाते ऑक्टोबर २०२५ मध्ये परिपक्व होईल.
हे खाते उघडण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता. तेथे जा आणि खाते उघडण्याचा फॉर्म भरा आणि आधार आणि पॅन सारख्या केवायसी कागदपत्रांची माहिती प्रविष्ट करा. यानंतर, रोख किंवा चेकद्वारे खात्यात पैसे जमा करा. यानंतर तुमचे एमएसएससी खाते उघडले जाईल. या योजनेची विशेष बाब म्हणजे कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये खाते उघडू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

विशेषतः मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, १० वर्षांपर्यंतच्या मुलीचे खाते उघडले जाऊ शकते. या योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेवर ८ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत, तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेंतर्गत मुलीचे वय १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. यानंतर, वयाच्या १८ व्या वर्षी, मुलगी अभ्यासासाठी ५० टक्के रक्कम काढू शकते आणि वयाच्या २१ व्या वर्षी ती खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकते. या योजनेअंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्ही हे खाते जवळच्या कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील उघडू शकता.

कोणती योजना चांगली आहे?

MSSC आणि SSY या दोन्ही योजना खास महिलांसाठी तयार केल्या गेल्या आहेत, परंतु दोन्हीमध्ये खूप फरक आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही अल्प मुदतीची बचत योजना आहे, तर सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन बचत योजना आहे. कोणतीही महिला MSSC खात्यात गुंतवणूक करू शकते, तर SSY फक्त मुलींसाठी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ध्येयानुसार कोणतीही योजना निवडू शकता. जर तुम्हाला दीर्घ मुदतीच्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर SSY हा एक चांगला पर्याय आहे. तर अल्प मुदतीसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर…

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *