Breaking News

Tag Archives: union government

खुल्या बाजारात गहू- तांदूळ विक्रीसाठी खास स्किम आणण्याचे संकेत केंद्र सरकारकडून गांभीर्याने विचार

खाजगी व्यापाऱ्यांना गहू बाजारापासून दूर ठेवण्यासाठी आणि ३७.३ दशलक्ष टन (एमटी) चे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकृत खरेदीला परवानगी देण्यासाठी भारत सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) धोरणासह तयार असल्याचे संकेत दिले आहेत. संपूर्ण वर्षभर ई-लिलावाद्वारे गहू किमान ₹२,२७५/क्विंटल (किमान आधारभूत किंमतीप्रमाणे) या दराने विकला जाण्याची शक्यता आहे. या …

Read More »

केंद्र सरकारची ई वाहन धोरणाला मान्यता ४ हजार १५० कोटींची गुंतवणूकीची आवश्यकता

शुक्रवारी, केंद्र सरकारने ई-वाहन (EV) धोरणाला मान्यता दिली आहे ज्यामुळे भारताला ईव्हीसाठी उत्पादन गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन दिले जाईल. किमान ₹४,१५० कोटी गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. प्रतिष्ठित जागतिक ई व्ही उत्पादकांकडून ई-वाहन क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा …

Read More »

कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय?

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी

केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहीत निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा बंद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच बंद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊन, ते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून …

Read More »

बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …

Read More »

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या …

Read More »

केंद्राकडून पी.व्ही.नरसिंहराव, एम.एस.स्वामीनाथन, चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यथेच्छ टीकास्त्र सोडल्यानंतर आणि देशाच्या आर्थिक दूरावस्थेला काँग्रेसला जबाबदार धरले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस.स्वामीनाथन आणि माजी जनता पक्षाच्या काळात उपपंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना देशाचा …

Read More »

स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर…

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला. या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली …

Read More »

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद केली. या तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकरसह विविध वाहन चालकांनी मागील दोन दिवसापासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले. त्यास विविध वाहन चालकांनी मोर्चे काढत पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने सर्वसामान्य जनतेसह …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »