Breaking News

अबब, ऑगस्टमध्ये युपीआयच्या माध्यमातून १० अब्ज व्यवहार डिजिटल पेमेंटवर देशवासीयांचा विश्वास वाढला

युनिफाइड पेमेंट्स सिस्टम (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांची संख्या ऑगस्टमध्ये १० अब्जांच्या पुढे गेली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी युपीआय व्यवहारांची संख्या १०.२४ अब्जांवर पोहोचली आहे. या व्यवहारांचे मूल्य १५,१८,४५६.४ कोटी रुपये आहे. जुलैमध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या ९.९६ अब्ज होती. तर जूनमध्ये ती ९.३३ अब्ज होती. NPCI ही देशातील सर्व रिटेल पेमेंट सिस्टमसाठी नोडल संस्था आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये युपीआय द्वारे व्यवहारांची संख्या केवळ ३.५ अब्ज होती, जी दोन वर्षांत जवळपास तीन पटीने वाढली आहे. आता आपल्या देशातील बहुतांश व्यापारी युपीआय द्वारे व्यवहार करण्यावर विश्वास दाखवत आहेत. आज करोडो रुपये कमावणारे व्यापारी असोत किंवा भाजीपाला विकणारे छोटे-मध्यम दुकानदार असोत, सगळे युपीआय द्वारे व्यवहार करत आहेत.

विशेष म्हणजे ३५ हून अधिक देशांना आता भारताचे युपीआय तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे. ज्या देशांनी अलीकडेच युपीआयचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवले आहे त्यात जपानचा समावेश आहे. २०१६-१७ मध्ये नोटाबंदी दरम्यान भारत सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले. २०१६ मध्ये मोदी सरकारने UPI-BHIM लाँच केले. नोटाबंदीनंतर लोक मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंटवर अवलंबून राहू लागले.

यूपीआय व्यवहारांच्या संख्येत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे लहान शहरे आणि गावांमध्ये डिजिटल पेमेंटच्या व्याप्तीचा विस्तार. या क्षेत्रांमध्ये, फीचर फोनचा वापर UPI123Pay द्वारे पेमेंटसाठी केला जात आहे. याशिवाय या पेमेंट प्रणालीद्वारे सीमापार होणार्‍या व्यवहारांनाही चालना मिळाली आहे.

यानंतर कोविड महामारीच्या काळात देशातील बहुतेक लोकांनी डिजिटल पेमेंटद्वारे पैसे भरण्यासाठी रोख रकमेऐवजी युपीआय निवडले आणि आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र भारतीयांचा युपीआयवर अतूट विश्वास आहे.
आरबीआयचे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम विभागाचे महाव्यवस्थापक के विजयकुमार म्हणाले, ‘आम्ही १०० अब्ज रुपयांचे लक्ष्य कधी गाठू याविषयी सध्या कोणतीही कालमर्यादा नाही, परंतु युपीआय १२३ आम्हाला हे लक्ष्य जलद गाठण्यास मदत करेल.

Check Also

आरबीआय बँक केंद्र सरकारला देणार १ लाख कोटी रूपये युनियन बँकेच्या अहवालातून माहिती आली पुढे

युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय बँकेकडून FY25 मध्ये अंदाजे ₹१,००,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *