Breaking News

बजाज होल्डिंग्जचे गुंतवणूकदार मालामाल, मिळणार प्रति शेअर इतका लाभांश कंपनीकडून लाभांशाची घोषणा

बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ११० रुपये लाभांश मंजूर केला. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २९ सप्टेंबर २०२३ आहे.

बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३५ रुपयांचा लाभांशही दिला होता. याशिवाय आर्थिक वर्ष २०२२ मध्ये प्रति शेअर ११५ रुपये एकूण लाभांश देण्यात आला आहे. त्यामुळे बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ झाला आहे.

बजाज होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सची किंमत ७१२६.०५ रुपये आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर्स ७१४२.९० रुपयांवर पोहोचला. बजाज होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सने १७ जुलै २०३ रोजी ७,६३८ रुपयांची पातळी गाठली. शेअर्सचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांका आहे. शेअर्सची किंमत २० सप्टेंबर २०१८ रोजी ३१०० रुपये होती. गुंतवणूदाराने पाच वर्षापूर्वी या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आजही कायम ठेवली असेल तर त्यात १३० टक्क्यांची वाढ झाली असेल. म्हणजेच गेल्या पाच वर्षात शेअर्स ४००० रुपयांनी वाढला आहे.

बजाज होल्डिंग्सची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये ३३.४३ टक्के आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेडमध्ये ३९.२९ टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीकडे बजाज ऑटो होल्डिंग लिमिटेडमध्ये १०० टक्के आणि संयुक्त उपक्रम महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडमध्ये २४ टक्के हिस्सा आहे. जून तिमाहीत बजाज होल्डिंग्सचे उत्पन्न ११९ कोटी होते. मागील वर्षीच्या तिमाहीत उत्पन्न १०४.२४ कोटी होते. जून तिमाहीत निव्वळ नफा ५,००३.४० कोटी होता.

Check Also

जिओचा नवा मनोरंजन प्लॅन अवघ्या ८८८ रूपयात या ओटीटी प्लॅनचे आनंद लुटता घेता येणार

जिओने अलीकडेच एक आकर्षक पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यात उत्साही स्ट्रीमर्सना लक्ष्य केले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *