Breaking News

सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह ६७,८३८.६३ या विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे मार्केट कॅप घसरले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मार्केट कॅप ५७,३००.७५ कोटी रुपयांनी वाढून १३,१७,२०३.६१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप २८,९७४.८२ कोटींनी वाढून १२,५८,९८९.८७ कोटी रुपये झाले. त्याचप्रमाणे भारती एअरटेलचे मार्केट कॅप २८,३५४.७३ कोटी रुपयांनी वाढून ५,२३,७२३.५६ कोटी रुपये, इन्फोसिसचे १७,६८९.५३ कोटी रुपयांनी वाढून ६,२३,६३७.८७ कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप १५,३६४.५५ कोटींनी वाढून ५,२३,७२३.५६ कोटी रुपये झाले. एसबीआयचे मार्केट कॅप १३,३४२.३ कोटी रुपयांनी वाढून ५,३४,०४८.७८ कोटींवर गेले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ७,४४३.७९ कोटी रुपयांनी वाढून १६,६४,३७७.०२ कोटी रुपये, आयटीसीचे मार्केट कॅप ७,२३२.७४ कोटी रुपयांनी वाढले. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप ५,०९५.७८ कोटी रुपयांनी वाढून ५४,०३९.३७ कोटींवर पोहोचले. दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हरचे मार्केट कॅप १०,५१४.४२ कोटी रुपयांनी घसरून ५,८०,३२५.५५ कोटी रुपयांवर आले.

कोणती कंपनी टॉपवर?

टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.

Check Also

जागतिक युध्दसदृष्य परिस्थितीमुळे भारतीय निर्यातीवर परिणाम ३.१ टक्क्याने भारतीय मालाची निर्यात घटली

जागतिकस्तरावर भौगोलिक-राजकीय युध्दसदृष्य संघर्ष, जागतिक मागणीतील घट आणि वस्तूंच्या किमतीतील घसरण यांचा भारताच्या परकीय व्यापारावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *