Breaking News

श्रीगणेशाला हार, फुले, मोदकांसह शैक्षणिक साहित्य करू या अर्पण गणेशभक्तांना एक वही, एक पेन अभियानचे आवाहन

समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता असलेल्या गणरायचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून नमन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे .

१९ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते .राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमदेखील राबविले जातात याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला येताना हार फुले, मोदक, नारळ या पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग ,वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे .

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्या वतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.

जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील गरजू होतकरू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना वितरीत करून या विदयार्थ्याना मदतीचा हात देण्यात यावा अधिक माहितीसाठी तसेच सहकार्यासाठी मदतीसाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मागील आठ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *