Breaking News

ऑगस्टमध्ये निर्यात घटून ३४.४८ अब्ज डॉलरवर, आयातीतही घट जी २० नंतरही सर्वच गोष्टीत घट

भारताच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात ६.८६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये निर्यात ३४.४८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्यात ३७.०२ अब्ज डॉलर होती. ऑगस्ट महिन्यात देशाच्या आयातीच्या आकड्यातही घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देशाची आयात ५.२३ टक्क्यांनी घसरून ५८.६४ अब्ज डॉलरवर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आयात ६१.८८ अब्ज डॉलर होती
ऑगस्ट महिन्यात देशाची व्यापार तूट २४.१६ अब्ज डॉलर होती. या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान, देशाच्या निर्यातीत ११.९ टक्के घट झाली आणि ती १७२.९५ अब्ज डॉलरवर पोहोचली. गेल्या पाच महिन्यांत देशाची आयातही कमी झाली आणि ती २७१.८३ वर पोहोचली.

ऑगस्टमध्ये देशाची व्यापार तूट २४.१६ अब्ज डॉलर राहिली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एप्रिल-ऑगस्ट दरम्यान निर्यात ११.९ टक्क्यांनी घसरून १७२.९५ अब्ज डॉलर झाली आणि आयात १२ टक्क्यांनी घसरून २७१.८३ अब्ज डॉलर झाली.

ऑगस्ट महिन्यात सेवा निर्यात आणि आयात या दोन्हीमध्ये घट झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये सेवा निर्यात २६.३९ अब्ज डॉलर झाली. मागील वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये सेवा निर्यात २७.१७ अब्ज डॉलर होती. तर सेवा आयात ऑगस्ट २०२३ मध्ये १३.८६ अब्ज डॉलर राहिली आहे. जी एका वर्षापूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये १४.८५ अब्ज डॉलर होती. सेवा निर्यात आणि सेवा आयातीतही घट झाली असून, त्याचा परिणाम व्यापार तुटीच्या आकड्यांवर झाला आहे.

इतर क्षेत्रांची आयात-निर्यात आकडेवारी चांगली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची वाढ ७.७३ टक्के तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाढ २६.२९ टक्के राहिली आहे. सिरेमिक वस्तू, औषधे आणि फार्मा, कृषी निर्यात देखील चांगली कामगिरी करत आहेत.

Check Also

ऑगस्टमध्ये डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील उच्चांक एकूण खात्यांची संख्या १२.६६ कोटींच्या वर

ऑगस्टमध्ये निर्देशांकात घसरण होऊनही डिमॅट खाती उघडणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *