केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये ६.७% पर्यंत कमी झाली. विशेष म्हणजे पायभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना देशाच्या कोअर सेक्टरचा भाग समजले जाते.
कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खत, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये जानेवारी २०२४ मध्ये ४.१% आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये ७.४% वाढ झाली.
तसेच, एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ मधील ८.२% विरुद्ध या आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारीमध्ये या क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढीचा दर ७.७% इतका कमी झाला.
देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) आठ प्रमुख क्षेत्रे ४०.२७% योगदान देतात.