२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे कंबरडे मोडायचे असल्याचे सांगत अचानकच देशातील एक हजार, ५०० रूपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे संबध देशवासियांकडे असलेल्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा कागदाचे गोळे ठरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार रूपयांची आणि पाचशे रूपयांची नवी …
Read More »अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा
अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा …
Read More »पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता सहकार मंत्री अतुल सावे यांची ग्वाही
“राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत …
Read More »मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर मंजूर प्रकरणांपैकी पन्नास टक्के लाभार्थी या महिला उद्योजक ६ हजार ३९५ महिलांना बॅंकेने कर्ज उपलब्ध
उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण १२ हजार ३२६ …
Read More »GeM हे राष्ट्रहिताचे डिजिटल साधन: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सरकारी खरेदीच्या पद्धतीने, महिला उद्योजक, स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्राला न्याय्य
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सरकारी पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत GeM च्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक …
Read More »नोकरदारांसाठी खुषखबरः ईपीएफच्या व्याजदारात वाढ केंद्र सरकारकडून लवकरच पत्रक जारी
पगारदार नोकरवर्गासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यासंदर्भात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात सीबीटीची दोन दिवसीय बैठक २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याचं या वृत्तात …
Read More »आधार-पॅन लिंक करायचे राहून गेले? आता या तारखेपर्यंत लिंक करा ३१ मार्चची मुदत आता ३० जून पर्यंत वाढविली
देशातील करदात्या नागरीकांची माहिती एकाच कार्डाद्वारे उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून पॅनकार्डधारक आणि आधार कार्डधारकांचा डेटा एकच असावा या उद्देशाना पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी आयकर विभागाने ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याची मुदत देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक नागरिकांकडून या …
Read More »आर्थिक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयकडून राज्यातील ‘या’ बड्या बँकावर कारवाई भाजपाचे माजी मंत्री देशमुख यांची लोकमंगल, आरबीएल आणि रायगड जिल्हा सहकारी बँक व एचएफसी बँकेलाही ठोठावला दंड
आर्थिक वर्ष संपत आल्याने खाजगी, सहकारी तत्वावरील बँकाकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटप प्रकरणी आणि सादर करण्यात आलेल्या लेखापरिक्षातील खात्यातील आकडेवारीची माहिती आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेला सादर करावी लागते. मात्र रिझर्व्ह बँकेला सादर कऱण्यात आलेल्या लेखा परिक्षण अहवालात ८ सहकारी आणि खाजगी बँकांच्या व्यवहारांमध्ये आयरबीआयने निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात …
Read More »आर्थिक वर्ष संपण्यास फक्त ९ दिवस, सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या राहणार मात्र १ आणि २ एप्रिलला बँकामध्ये कामकाज नाही
चालू २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे नऊ दिवस शिल्लक उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना केली जाते. सर्व खात्यांचा हिशेब मार्च महिन्यातच केला जातो, त्यानंतर मग ती बंद केली जातात. त्यामुळेच रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी सर्व बँका खुल्या …
Read More »अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादरः वाचा नव्या घोषणांचे अपटेड अनेक नव्या घोषणा, आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अनेक घोषणा
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवत सर्व घटकांना खुष करणारा अर्थसंकल्प २०२३-२४ चे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर करण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्पाची विभागनी दोन भागात करणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच जाहिर केले. अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा… छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे …
Read More »