Breaking News

मंत्री यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका, नवनीत राणा बेशर्म आणि वेडी अमरावतीतील स्वतच्या स्वागत सोहळ्यावरून साधला निशाणा

हनुमान चालिसावरून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर तुरुंगावारी करून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ३६ दिवसानंतर काल आपल्या शहरात परतल्या. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषाप्रकरणी विविध अशा तीन गुन्ह्यात राणा दाम्पत्यावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या म्हणाल्या की, राणा दाम्पत्याचे रडगाणे किती दिवस गायचे. ते बेशर्म असून नवनीत राणा वेडी असल्याची बोचरी टीका केली.

नागपुरात काँग्रेसच्या समाज माध्यम विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवसंकल्प शिबिराच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता यशोमती ठाकूर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

एखादा चांगला विषय असेल तर आपण बोलायला पाहिजे. ते राणा दाम्पत्याचे रडगाणे किती दिवस गायचे. खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्जपणा करतच राहणार आहेत अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांवर शनी अशी टीका केल्याबद्दल विचारले असता त्यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, जो दुसऱ्याचा मान सन्मान करु शकत नाही, तो स्वतःचाही कधीच मान सन्मान करत नसतो. ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या देशात राहतो तिथे तिरंग्याचा सन्मान महत्वाचा आहे. याची आठवणही त्यांनी राणा दाम्पत्याला करून दिली.

सगळ्यांनी एकत्र राहावे, सगळ्यांना सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे. निवडून येण्यासाठी एक प्रकारे हा तमाशा काय करायचा, कोणालाही काहीही बोलायचे. नवनीत राणा यांनी बेशर्मीची हद्द गाठली असल्याची टीकाही त्यांनी केली.

नवनीत राणा वेडी असून काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. ते मीडियामध्ये येण्यासाठी हे सगळं करतात असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, राणा दाम्पत्यासह त्यांच्या पावणे दोनशे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर ध्वनी प्रदुषण करणे, रस्ता अडवणे यासह निर्धारीत वेळेपेक्षा अधिक काळ कार्यक्रम करणे आदी प्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *