Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींवर निशाणा; बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल रिझर्व्ह बँकेचा अहवालच पुरेसा बोलका

नुकताच रिझर्व्ह बँकेने आपला वार्षिक अहवाल जारी केला असून या अहवालात २ हजार रूपयांच्या चलनातील जवळपास १५ टक्केहून अधिक नोटा गायब झाल्याचा सांगितले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगलाच असल्याची बाबही नमूद केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर आणि फेसबुक हँण्डलवरून केलेल्या पोस्टमध्ये बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा हवाला देत मोदी सरकारच्या नोटबंदी धोरणावर सडकून टीका केली. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये दीडपट वाढ झाल्याचं म्हणत नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप केला. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालाने मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही राष्ट्रवादीने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं, “बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल! गतसालाच्या तुलनेत ५०० रुपयांच्या दुप्पट तर २००० रुपयांच्या दीडपट बनावट नोटा सापडल्या. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मार्फत शुक्रवारी २७ मे २०२२ प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार आपल्या देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १०१.९ टक्क्याने वाढले आहे. २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्के इतके वाढले असल्याची बाब नमूद केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशासमोर येऊन मोठ्या अभिमानाने देशात नोटबंदी करत असल्याची घोषणा केली. देशातून भ्रष्टाचार दूर व्हावा आणि जनतेला सोसावी लागणारी महागाई कमी व्हावी, हे त्या मागचं मूळ असल्याचेही त्यांनी सांगितलं होते. मात्र तसे झाले का? असा सवाल करत हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला हा अहवाल मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी पुरेसा असल्याची टीकाही केली. तसेच रिझर्व्ह बँकेच्या त्या अहवालाची लिंकही पोस्टमध्ये दिली.

https://twitter.com/NCPspeaks/status/1530841705234468865?s=20&t=X9vF-qLhzQzgq5v8HZWODw

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *