Breaking News

महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी

ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला लिहिलेले पत्रच प्रसारमाध्यमांना प्रसिध्दीसाठी दिले.

ओबीसीचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळावे यामागणीसाठी मागील आठवड्यात भाजपाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव घेत “संसदेत जा नाहीतर मसनात जा नाहीतर घरी जावून स्वयंपाक कर पण आम्हाला ओबीसी आरक्षण आणून द्या” असे बेताल वक्तव्य केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून राज्यातील विविध भागात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर काही ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला साडी घालून त्यांची ओटीही भरण्यात आली.

यापार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत चंद्रकांत पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. तरीही पाटील यांनी सुरुवातीला आपल्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांना आनंद झाल्याचे वक्तव्य करत ते वक्तव्य आपण ग्रामीण पध्दतीने केल्याचे सांगत आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून चंद्रकात पाटील यांच्या विरोधात आंदोलन सुरुच ठेवले.

अखेर पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला पत्र पाठवित त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

त्यानंतर राज्य महिला आयोगाने, खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना याबाबतचा खुलासा दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. चंद्रकांत पाटील यांचा खुलासा प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दुःख व्यक्त करून सुप्रिया सुळे व समस्त महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे.  यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलेले हेच ते पत्र:

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *