Breaking News

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज मंत्री सुभाष देसाईं घरी बसणार का?

राज्यसभेच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता विधान परिषद निवडणूकीची वावटळ सुरु झाली. या वावटळीत शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव जाहीर झाली नाहीत. मात्र आज शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबार येथील आमश्या पाडवी या दोघांना उमेदवारी जाहिर झाली. तसेच या दोघांनी आज विधानभवनात येवून विधान परिषदेकरीता अर्जही भरला.

वाचा

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे काल शिवसेनेकडून विधान परिषदेचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नावांना डच्चू देण्याचा निर्णय शिवसेनेतील नेत्यांनी घेतला. त्यानुसार या दोन ज्येष्ठांना डावलत त्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.
त्यानुसार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी या दोघांनी अर्ज भरला. यावेळी या दोघांच्यासोबत शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्ये आणि नेते उपस्थित होते. या दोन उमेदवारांच्या निमित्ताने शिवसेनेकडून आदिवासी आणि ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देवून समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन अहिर हे मुंबईतील आहेत. तर आमश्या पाडवी हे नंदूरबार येथील आहेत.

वाचा

मात्र सध्या दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या दोघांपैकी सुभाष देसाई हे उद्योग मंत्री आहेत. मात्र आता त्यांना यंदा उमेदवारी नाकारल्याने सुभाष देसाई यांचे मंत्री पद राहणार की जाणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र राज्यघटनेतील तरतूदीनुसार कोणत्याही सभागृहाचे सदस्य न राहताही ६ महिने मंत्री पदावर राहता येऊ शकते. परंतु सध्या तरी सुभाष देसाई यांचे काय करायचे याबाबतचा निर्णय शिवसेनेकडून अद्याप झाल्याचे दिसून येत नाही. परंतु राज्यसभेच्या निवडणूकीनंतर त्यांच्याबाबत योग्य निर्णय होऊन त्यांना नारळ देवून निरोप देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *