Breaking News

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदान, नबील कॉलनी, बैतुल रोड याठिकाणी सकाळी ११ वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झीबिशन ग्राउंड, मरिआई चौक येथे दुपारी ३.५५ वाजता प्रचार सभा होणार आहे.

अमरावतीच्या सभेला राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व CWC सदस्य यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे, अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, प्रीती बंड, सुनील खराटे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रदीप राऊत, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, संगीता ठाकरे, वर्षा भटकर यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

तर सोलापूर येथील सभेला राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व लोकसभेच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट नेते माजी आ. नरसय्या आडम, दिलीप माने, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात सुरु असून राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भंडारा-गोंदिया मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची १४ एप्रिल रोजी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *