Breaking News

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व आमदारांना अपोलो बंदर येथील ताज हॉटेलमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाचाही आपल्या आमदारांवर विश्वास नाही का? असा सवाल राजकिय वर्तुळात विचारला जात आहे.

शिवसेनेसह महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मतांच्या भरोशावर शिवसेनेकडून कोल्हापूरचे शहर प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपानेही त्यांच्याकडील अतिरिक्त मतांच्या भरोशावर तिसरा उमेदवार जाहिर केला. त्यामुळे मागील २० वर्षापासून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत होती मात्र आता मतदान होणार आहे. या निवडणूकीत सारी भिस्त अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांवर आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने मोठे पक्ष म्हणून घेणाऱ्या शिवसेना, भाजपाकडे संख्याबळ पुरेसे असले तरी अतिरिक्त उमेदवार निवडूण येण्याइतक्या मतांची कमतरता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची एकूण मते आणि मविआला समर्थन देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांना गोंजारण्याचे काम आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

तर दुसऱ्याबाजूला भाजपाला कमतरता असलेल्या १३ मतांसाठी भाजपाकडून महाविकास आघाडीसोबत असलेल्या काही छोट्या पक्षांशी आणि अपक्ष आमदारांसोबत संवाद साधून आपल्याबाजूला खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून कमी मतांची जमावाजमव होवून भाजपाचा तिसरा उमेदवार सहजरित्या निवडूण येईल. त्यादृष्टीने भाजपाकडून जवळपास कुंपणावर असलेल्या सर्वच छोट्या पक्षांना आणि आमदारांशी संपर्क करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने कालच आपल्या सर्व आमदार आणि समर्थक आमदारांना रिट्रीट या हॉटेलमध्ये स्थलांतरीत केले. तर काँग्रेसकडून त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या आमदारांची व्यवस्था पंचतारांकीत हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून खबरदारीचा उपाय आपल्या १०६ आणि समर्थक मिळून ११३ आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व आमदार उद्या अपोलो बंदर येथील ताज हॉटेलवर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपालाही आता आपल्याच पक्षाच्या आमदारांवर अविश्वास निर्माण झाला की काय अशी चर्चाही राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *