Breaking News

पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्यासह तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. विशेष म्हणजे या उमेदवारी यादीवर फडणवीसांची पूर्ण छाप दिसून येत आहे.

भाजपाकडून विधान परिषदेच्या निवडणूकीकरीता काल यादी जाहिर होणार होती. मात्र ती यादी आज सकाळी जाहिर करण्यात आली. भाजपाने आपल्या उमेदवारी यादित पहिल्यास्थानी माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या जून्या सदस्यास उपवाद करत माजी मंत्री राम शिंदे, उपाध्यक्ष प्रसाद लाड, फडणवीसांच्या काळातील मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती ते श्रीकांत भारतीय आणि महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे या चार नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या पाचही उमेदवारांच्या नावाकडे पाह्यले असता या यादीत फडणवीसांच्या मर्जीतील पाचही नावे असल्याचे दिसून येत आहे. प्रविण दरेकर यांनी मनसेतून भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा दरेकर यांच्याकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी फडणवीसांनीच सोपविली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले प्रसाद लाड यांनीही प्रवेश केल्यानंतर भाजपाच्या उपाध्यक्ष पदी यांची वर्णी फडणवीसांच्या सल्ल्यानुसारच झाली होती.

याशिवाय फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले मात्र नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी हिमालयातील मानसरोवर येथून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश करत मानसरोवर येथून पाणी आल्यानंतर एकदम कॅबिनेट मंत्री म्हणून बढती झालेले प्रा.राम शिंदे हे ही फडणवीसांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदी सध्या असलेल्या उमा खापरे या असल्या तरी त्या फारसे प्रसारमाध्यमामध्ये फारच्या चर्चेत नाहीत. परंतु त्याही फडणवीसांच्या गोटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस समर्थक असलेल्या या पाच जणांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे.

मात्र पंकजा मुंडे यांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात. त्यामुळे फडणवीस समर्थक असलेल्या प्रविण दरेकर यांची अडचणी होवू शकते. तसेच राज्यात आणि विधिमंडळात फडणवीसांना पर्याय निर्माण ठरू शकतात. त्यामुळे जाणीवपूर्णक त्यांचा पंकजा मुंडे यांची उमेदवारी कापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *