Breaking News

ओवेसी म्हणाले, महाविकास आघाडीने मागितली तर मदत करू… भाजपाला हरविण्यासाठी मागितल्यास मदत करण्याची तयारी

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेवरील आपलाच उमेदवार निवडूण येण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळविण्यासाठी युध्द पातळीवर सर्व पध्दतीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यात छोट्या पक्षांच्या यादीत असलेल्या एमआयएम पक्षाचे दोन आमदार विधानसभेत आहेत. परंतु या पक्षांच्या दोन आमदारांच्या पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविली असून मदत मागितल्यास नक्कीच मदत करू असे वक्तव्य एमआयएमचे खासदार तसेच प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

वाचा

सहयोगी व अपक्ष आमदारांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसेनेसाठी दुसरी जागा निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यात लक्ष घालत आहेत. दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असं आवाहन ओवेसी यांनी केले आहे.

महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

वाचा

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी वर्षां या सरकारी निवासस्थानी शिवसेनेच्या व सहयोगी आमदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टक्केवारीचा आरोप करत घरचा अहेर देणारे शिवसेनेचे माजी व आता अपक्ष आमदार आशीष जैस्वाल यांच्यासह इतर अपक्ष आमदारही बैठकीला उपस्थित होते.

तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे हे भाजपाच्या दृष्टीने अधिक फायद्याचे व तसे भाजपाने सूचित केल्यानेच काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. सर्व आमदार मतदानाला उपस्थित राहावेत याकरिता महाविकास आघाडीने मंगळवारी सर्व आमदारांना मुंबईतच पाचारण केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी बैठक आयोजित केली असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे हे मार्गदर्शन कऱणार आहेत.

हे ही वाचा

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *