Breaking News

नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद, अरब देशात मोदींचा फोटो कचरा कुंडीवर संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत केली कारवाईची मागणी

दोन तीन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणी केली. या टीप्पणीवरून आंतरराष्ट्रीयस्तरावर त्याचे पडसाद उमटत असून अरब राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरा कुंडीवर लावण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या फोटोवर बुटाचे ठसेही उमटविण्यात आल्याने भारताबद्दल अतिशय नकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात येत आहे.

नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने देखील या वक्तव्याची निंदा केली आहे. तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे.

प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी बहरीन आणि कुवेत देशातील नागरिकांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. तसेच कुवेतमधील काही कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर संबंधित फोटोंवर बुटाचे ठसे देखील उमटवण्यात आले आहे. संबंधित घटनेचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भारतातील अनेक नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील एक ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचं कृत्य अतिशय संतापजनक आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. नरेंद्र मोदी आमचे विरोधक असले आणि त्यांची विचारसरणी आम्हाला पटत नसली तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा विरोध करू.

पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला हवी. मोदीजी हे भारताचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अशाप्रकारे होत असलेली बदनामी आम्ही मुळीच सहन करणार नाही.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान कथितपणे प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीनंतर देशभरात पडसाद उमटले. उत्तर प्रदेशातील कानपूर

याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली. यामध्ये १२ हून अधिकजण जखमी झाले आहेत. घटनेची तातडीने दखल घेतल्याने कानपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र आता संबंधित वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. वाढता विरोध पाहून भाजपाने काल भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *