Breaking News

Tag Archives: MVA Government

नाना पटोले यांची टीका, बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा मविआ सर्वच आघाड्यांवर सरस माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार बोलघेवड्या शिंदे फडणवीसांचे पितळ उघडे

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटला होता. कोरोनाचे दोन वर्षांचे भिषण संकट, भाजपाकडून केंद्रीय संस्था आणि राज्यपालांच्या माध्यमातून केली जाणारी षडयंत्रे यावर मात करत राज्यातील गुंतवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा दावा,… तर मविआच्या २०० पेक्षा कमी जागा येणार नाहीत कर्नाटकचा फॉर्मुला महाराष्ट्रातही राबविणार

महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदे- फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. त्यातच राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांसोबत सापत्नपणाची वागणूक द्यायला सुरुवात केली. …

Read More »

‘निर्भया’ निधीतील वाहनांबाबत सुप्रिया सुळेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या…. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा घणाघात

निर्भया निधीतील वाहनांबाबत खा. सुप्रिया सुळे , खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार आहे. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने मविआ सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या दावणीला बांधली गेली होती , असा घणाघात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

मविआकडून राहिलेल्या प्रस्तावावर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविणार

राज्यातील मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारचा उत्तम पण आस्ते कदम सुरु असलेल्या कारभारामुळे मविआच्या विरोधात काही गोष्टी सुरु असल्याची कल्पना मविआच्या नेत्यांना कदाचित नव्हती. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर बसविण्याच्या प्रस्तावाची फाईल अंतिम मंजूरीसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचली आणि सारेच वातावरण बदलले. त्यामुळे महाविकास आघाडीने तयार कलेल्या …

Read More »

मविआ सरकार जाताच शिंदे सरकारने सहकारी संस्थांसाठीचा ‘हा’ निर्णय बदलला १०० सदस्यांपर्यंत रु.७५००, बिनविरोध निवडणुकीसाठी रु. ३५०० खर्चाची मर्यादा

महाविकास आघाडी सरकारने सहकारी सोसायट्यांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले होते. या निर्णयाच्या विरोधात भाजपाकडूनही सातत्याने आवाज उठविण्यात येत होता. यापार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे सरकारने रद्दबातल ठरवित नवा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात नवा शासन निर्णयही …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन; वेळ गेलेली नाही, कुटुंबप्रमुख म्हणून काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची खरी यावरून एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, आता मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवायचे… आमच्याकडे संख्याबळ जास्त

शिवसेनेतील बंडाळीचा आज दुसरा दिवस असून कालच्या तुलनेत आज उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर हक्कावरून लढाईला सुरुवात झालेली दिसून येत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे अल्पमतात आले आहे. त्यातच आज गुवाहटी येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. एकनाथ …

Read More »