Breaking News

Tag Archives: MVA Government

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, जूनमध्ये मांडणार मध्य प्रदेश सरकारच्या याचिकेवरील निर्णयावर बोलताना स्पष्ट केले

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्य प्रदेश राज्य जसं सर्वोच्च न्यायालयात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत …

Read More »

महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, ओबीसी आरक्षणप्रश्नी मध्य प्रदेशात चार दिवसात काय चमत्कार घडला? केंद्र सरकारने तर मध्य प्रदेश सरकारला इम्पिरीकल डेटा दिला नाही ना ?

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना केल्या होत्या त्याच सुचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या, मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला की, मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निडणुका …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा खून मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे आदेश

मध्य प्रदेश राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर निर्णय घेताना त्या सरकारने सादर केलेल्या सुधारीत अहवालास मान्यता देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी करत त्याच आधारे राज्यातील निवडणूकाही आरक्षणासह होतील असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात ओबीसी …

Read More »

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …

Read More »

संभाजीराजेंनी सोडले भाजपाला, केल्या या दोन घोषणा 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, स्वतंत्र राजकिय वाटचाल करणार

भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार संभाजी राजे यांनी आज मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर करत या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी १२ मे रोजी आपली भूमिका …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींच्या संरक्षकाचा बुरखा फाडून खरा चेहरा बाहेर आणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ओबीसी मोर्चाला संदेश

महाविकास आघाडी सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत राज्य सरकारबरोबर संघर्ष चालूच ठेवावा व त्यासोबत ओबीसी समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांसाठीही ओबीसी मोर्चाने संघर्ष करावा, असा संदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. भाजपाच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश …

Read More »

संजय निरूपम म्हणाले, राज्य सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते अजामीनपात्र वॉरंट असूनही कारवाई करत नाही

महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत? हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते संजय निरुपम केले. द प्रिंन्टच्या …

Read More »

कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो अन् त्याच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीची दुकानदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीने ओबीसींना …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली निवडणूकीची प्रक्रिया नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत

काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षण आणि कोरोनामुळे रखडलेल्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूका प्रलंबित राहीलेल्या आहेत. मात्र त्याविषयीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने निवडणूकीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु केली. या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत राज्यातील २१६ नगर परिषदा-नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भातील हरकती व …

Read More »