Breaking News

Tag Archives: MVA Government

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शरद पवार यांची शांत प्रतिक्रिया, मार्ग निघेल मला विश्वास शिवसेनेकडून अद्याप कोणताही निरोप नाही

शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरतच्या आश्रयाला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक प्रस्ताव पाठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील सरकार संपुष्टात आणून पुन्हा एकदा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली. तसेच जर भाजपासोबत सरकार स्थापन …

Read More »

मविआकडून केंद्राला विरोध मात्र मोनोटायझेशन योजनेची पहिल्यांदा अंमलबजावणी या दोन शासकिय रूग्णालयाचा कारभार खाजगी संस्थांकडे जाणार

एकाबाजूला केंद्र सरकारच्या अनेक गोष्टींना महाविकास आघाडी सरकारकडून विरोध करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडूनही दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येतो. मात्र केंद्राच्या मोनोटायझेशन या योजनेतंर्गत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शासकिय महाविद्यालय आणि त्यासोबत असलेल्या रूग्णालयांचे खाजगीकरण कऱण्यासाठी महाविकास आघाडीनेच …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचा उमेदवार चमत्कारासाठी नाही तर… पाचही उमेदवार आमचेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत असा टोला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना लगावत शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, तो चमत्कार तर घडणारच चमत्कार कोणाच्या बाबत घडेल ते उभा महाराष्ट्र बघेल

चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी …

Read More »

खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो… भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. बोंडे यांची मागणी

राज्यसभेवरील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली की, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. ते माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सूनबाई असेल तर चांगले होईल अशी आगळीवेगळी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा टोला, मविआ सरकार नेहमीच उशीरा जागे होते म्हणून… ओबीसी आरक्षणावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्र्यांना टोला

राज्यात सध्या ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करायचे काम सुरु आहे. ते काम अंत्यत चुकीच्या आणि सदोष पध्दतीने होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर करत आपले सरकार नेहमीच उशीराने जागे होते. म्हणून मी आताच त्यांना जागे करत असल्याचा उपरोधिक …

Read More »

ओवेसी म्हणाले, महाविकास आघाडीने मागितली तर मदत करू… भाजपाला हरविण्यासाठी मागितल्यास मदत करण्याची तयारी

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेवरील आपलाच उमेदवार निवडूण येण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळविण्यासाठी युध्द पातळीवर सर्व पध्दतीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यात छोट्या पक्षांच्या यादीत असलेल्या एमआयएम पक्षाचे दोन आमदार विधानसभेत आहेत. परंतु या पक्षांच्या दोन आमदारांच्या पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविली असून मदत …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी शिवस्वराज्य दिन “अशा” पध्दतीने साजरा होणार राज्यात ६ जून "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा

राज्यात सोमवार ६ जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती …

Read More »

दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील कर ५० टक्क्याने कपात करा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल – डिझेल वरील करातही तातडीने ५० टक्के कपात करून जनतेला …

Read More »

मविआ सरकारचाही मोठा निर्णय: पेट्रोल-डिझेलवरील करात आजपासून कपात कर कमी केल्याने सुमारे २५०० कोटींचे नुकसान

देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली. यापार्श्वभूमीवर वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅट करात ८ रूपयांची तर डिझेलच्या दरात ६ रूपयांनी कपात करण्याची घोषणा करत ही कर कपात आजपासून लागू केली. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरीकांना पेट्रोल ९.५० पैशाने तर डिझेल ७ रूपये स्वस्त दरात मिळणार …

Read More »