Breaking News

मविआ सरकारचाही मोठा निर्णय: पेट्रोल-डिझेलवरील करात आजपासून कपात कर कमी केल्याने सुमारे २५०० कोटींचे नुकसान

देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली. यापार्श्वभूमीवर वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅट करात ८ रूपयांची तर डिझेलच्या दरात ६ रूपयांनी कपात करण्याची घोषणा करत ही कर कपात आजपासून लागू केली. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरीकांना पेट्रोल ९.५० पैशाने तर डिझेल ७ रूपये स्वस्त दरात मिळणार आहे. तसेच केंद्राने राज्य सरकारांना केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी आज २२ मेपासून करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

त्यामुळे आता महाराष्ट्रात केंद्राच्या कर कपातीमुळे ९.५० पैसे आणि राज्याने २.०८ पैसे असे मिळून ११ रूपये ५८ पैसाने स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. तर डिझेलवरील करात केंद्राने कर कपात केल्याप्रमाणे ७ रूपये तर राज्याने करात १ रूपये ४४ पैसे कपात केल्याने ८ रूपये ४४ पैशांनी स्वस्त दरात डिझेल उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

Check Also

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *