Breaking News

दुष्यंत चौटाला यांची मागणी, भाजपाने बहुमत सिध्द करून दाखवावे

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पत्र लिहून तीन अपक्षांनी मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला पाठिंबा काढून घेतल्यानंतर बहुतम सिद्ध चाचणीला घेण्याची मागणी केली. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली.

भाजपाने दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) सोबतचे संबंध तोडल्यानंतर मार्चमध्ये नवीन सरकार स्थापन केले. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सैनी यांनी पदभार स्वीकारला आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खट्टर यांना कर्नाल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. जेजेपी पक्षाचा सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला पाठिंबा दिला नाही.

बुधवारी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात दुष्यंत चौटाला म्हणाले की, जेजेपी सरकार स्थापनेसाठी इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहे.

९० सदस्यीय हरियाणा विधानसभा सभागृहात भाजपाचे ४०, काँग्रेसचे ३० आणि जेजेपीचे १० आमदार आहेत. इंडियन नॅशनल लोकदल आणि हरियाणा लोकहित पार्टीचे प्रत्येकी एक सदस्य असून सहा अपक्ष आमदार आहेत. यापैकी ३ अपक्ष आमदारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. तर भाजपा सरकारला दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.

दुष्यंत चौटाला म्हणाले की, अलीकडील घडामोडी सहापैकी तीन अपक्ष आमदारांनी भाजपाचा पाठिंबा काढून घेतले आहे. ज्यांनी यापूर्वी मार्चमध्ये भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता आणि आता त्यांनी पाठिंबा काढून घेतला.

पुढे बोलताना दुष्यंत चौटाला म्हणाले की, या घडामोडी आणि माझ्या पक्षाची स्पष्ट भूमिका पाहता, आम्ही सरकार स्थापनेसाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहोत. हे स्पष्ट आहे की भाजपा सरकारला आता विधानसभेत बहुमत नाही. तसेच भाजपा सरकार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करू शकत नसेल तर हरियाणामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही केली.

दरम्यान, हरियाणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाने राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पक्षाने म्हटले आहे की भाजपा सरकारने आपले बहुमत गमावले आणि राष्ट्रपती राजवट आणि नव्या निवडणुकांची मागणी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *