Breaking News

Tag Archives: MVA Government

ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचा प्रश्न, काय चाललंय राज्यात ? नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही- महेश तपासे

खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं… नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यावर महेश …

Read More »

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले, तर भिकारी भाजपाला दान करेन तसेच राजकारणही सोडेन

पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी ईडीने कारवाई करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर, प्रविण राऊत यांची पालघर, अलिबाग आणि दादर येथील एक सदनिका जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, जर एक जरी बेनामी मालमत्ता निघाली तर सर्व मालमत्ता भिकारी भाजपाला दान करेन असा खोचक …

Read More »

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना “तो” शब्द माहित आहे पण मी वापरणार नाही महाविकास आघाडी सरकारने वेश्यांच्या पैशातही डल्ला मारला

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या आदला बदलीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत खळबळ भाजपा नेते सुधीर मुनगंटावीर यांच्या वक्तव्यानंतर राजकिय टीका-टीपण्णीला वेग

राज्यातील महाविकास आघाडीतील ऐक्यतेवरून प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने ग्वाही देण्यात येते. मात्र राज्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री पदांची आदलाबदल करण्याबाबत शिवसेनेतील काही नेत्यांकडून मागणी करण्यात येत असल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते …

Read More »

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सर्व निर्बंध मागे, पण मास्क घाला..” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ …

Read More »

केंद्रापाठोपाठ राज्याचीही सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडवा भेटः महागाई भत्त्यात वाढ केंद्राप्रमाणे राज्यातही ३ टक्के वाढ

अवघ्या काही दिवसांवर नव हिंदू वर्ष सुरु होणार असून या नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेत ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी

राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व राजकीय अभिनिवेश बाजूला सारून, तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा आणि ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीला पुन्हा गती द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. २९ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात विविध भागात सुरू …

Read More »

भाजपाची काळी जादू चालणार नाही मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला. परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास काँग्रेस …

Read More »

महाविकास आघाडी म्हणजे, “मद्यविक्री आघाडी” तर अवस्था “आंधळ दळतय अनं…” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

राज्यात महाविकास विकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून दोन वर्षे झाली. काहीजण म्हणत होते की आम्ही फक्त निवडणूकीत बोलणारे पक्ष नाही तर करून दाखविणारे आहोत. राज्यातील जनतेसाठी विकास कामे करत असल्याचे बोलले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे मद्य विकणारे सरकार झाल्याची खोचक टीका करत ड्रंक ॲड ड्राईव्हमधून वाइनला वगळले का …

Read More »

एसटीप्रश्नी कर्मचाऱ्यांना फटकारत न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसाची मुदतवाढ कामावर का परत जात नाही – न्यायालयाचा सवाल

चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात नोंद घेत तुम्हाला कामावर परत जायला काय हरकत आहे असा सवाल एसटी कर्मचारी संघटनांना करत विलिनीकरणाबाबत अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या …

Read More »