Breaking News

Tag Archives: MVA Government

निवडणूक निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले… ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे - शरद पवार

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, …

Read More »

न्यायालयाच्या निर्देशानुसार फक्त “या” पाच महापालिकांच्या निवडणूका आयोग घेणार नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांचा समावेश

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर लढण्याच्या अनुषंगाने तयारी केलेली असतानाच तो पर्यंत या निवडणूका होवू नये यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि मुंबई महापालिका अधिनियम १९६५ या कायद्यात सुधारणा करत निवडणूकीचे सर्वाधिकार राज्य सरकारने स्वतःकेड घेतले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुदत संपून …

Read More »

मंत्री नवाब मलिकांना आता न्यायालयीन कोठडीः जामीन मिळण्याची शक्यता पीएमएलए न्यायालयाचा निकाल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत आल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २३ फेब्रुवारीला मनी लॉडरींग प्रकरणी ईडीने ताब्यात घेवून ९ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला ३ मार्च पर्यंत तर नंतर ७ मार्च …

Read More »

राज्यपालांच्या न केलेल्या भाषणात नेमके आहे काय? वाचा सविस्तर भाषण सविस्तर भाषण वाचकांसाठी आहे तसे

सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो, राज्य विधानमंडळाच्या, २०२२ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान …

Read More »

Budget Session: भाजपाच्या घोषणा, राज्यपालांचे २ मि.भाषण आणि राष्ट्रगीताचा अवमान घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी २ मिनिटात घेतले भाषण आटोपते

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात सांसदीय प्रथेप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपाला कोश्यारी यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणासाठी आले. मात्र भाषण सुरु केल्यानंतर भाजपाचे आमदारांनी सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केल्याने राज्यपालांनी आपले भाषण दोनच मिनिटात आटोपते घेतले आणि राष्ट्रगीताची वाट न पाहताच थेट निघून गेले. …

Read More »

राज्य सरकारकडून पहिल्या निर्बंध मुक्त १४ जिल्ह्यांची यादी जाहीरः १०० टक्के क्षमतेने सर्व सुरु अ वर्गात मोडणाऱ्या १४ जिल्ह्यांमध्ये काय सुरु कोठे निर्बंध

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्यांदाच निर्बंध मुक्त शहरांची यादी जारी केली आहे. या १४ जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी १०० टक्के क्षमतेने सुरु होणार असून या निर्बंध मुक्तीची अंमलबजावणी ४ मार्चपासून होणार आहे. …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …

Read More »

मंत्री अशोक चव्हाण संभाजी राजेंना म्हणाले, तो निर्णय कायदेशीरच मागासवर्ग आयोग स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, एकदा मागासवर्ग आयोगाची स्थापना केल्यानंतर दुसरा आयोग नेमता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा आयोगाची स्थापना का केली असा सवाल उपस्थित केला. …

Read More »

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का? भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांत पाटील यांचा सवाल

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघात त्यांनी …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआचा प्रभाग पध्दतीचा कायदा राज्यघटनेला छेद देणारा “एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य'' या संकल्पनेला बसतोय छेद

काही महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दती लागू करत सदस्य संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने नवा कायदा आणत विधिमंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नव्याने प्रभाग आणि वार्डांच्या सीमा नव्याने निर्धारीत करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यामुळे राज्यघटनेतील “एक व्यक्ती-एक …

Read More »