Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचा दावा,… तर मविआच्या २०० पेक्षा कमी जागा येणार नाहीत कर्नाटकचा फॉर्मुला महाराष्ट्रातही राबविणार

महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदे- फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. त्यातच राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांसोबत सापत्नपणाची वागणूक द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाल देऊनही त्यात पळवाटा शोधण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामी शक्कल लढवली आहे. ते आज एका कार्यक्रमात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जयंत पाटलांशी बोलून ५० हजार छोट्या पुस्तिका काढण्याच्या विचारात आहे, ज्यातून आपण सगळं सांगणार आहोत. पन्नास खोके आणि न्यायाविरोधात बनलेलं सरकार या दोन गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो तर कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल महाराष्ट्रात लागेल. २०० पेक्षा आपण कमी येणार नाही. म्हणून आपण सगळं करतोय, असं सांगितले.

शिवसेना शिंदे गटाने नवीन WHIP नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा भरत गोगावले यांच्या WHIP ला मान्यता देता येणार नाही हा दिलेला निकाल त्यांनी देखिल मान्य केलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे WHIP ने बजावलेल्या सगळ्याच नोटीस गैरलागू होतात. निकाल इतका स्पष्ट आहे. WHIP शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांचाच लागू होणार हे आता शिंदे गटानेही मान्य केले आहे, असं ट्वीट काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *