Breaking News

अरब देशांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून संजय राऊत म्हणाले, ते भाजपाच्या अंगलट… नुपूर शर्मा आणि नविनकुमार यांच्या वक्तव्यामुळे भारताने माफी मागावी अशी मागणी

काही दिवसांपूर्वी एका खाजगी चॅनेटवरील चर्चे दरम्यान प्रेषित मंहमद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णीचे पडसाद अरब राष्ट्रांमध्ये उमटले. तसेच त्या वक्तव्याप्रकरणी भारताने माफी मागावी अशी मागणी काही अरब राष्ट्रांनी करत अन्यथा भारतीय उत्पादीत मालांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे अखेर भाजपाने नुपूर शर्मा आणि नविनकुमार यांच्यावर निलंबन आणि निष्काषणाची कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधत म्हणाले की, भाजपावर धर्माचं राजकारण अंगलट आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागल्याचे ते म्हणाले. जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली आहे. सगळे देश भारतावर टीका करत नाहीयेत, पण त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होतोय असेही त्यांनी स्पष्ट केले.

याआधी अशी हिंमत कधी कुणी केली नव्हती. पण भाजपाने ज्या प्रकारचे विषारी विचार या देशात पेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यातून त्यांचं त्यांच्या लोकांवरचं नियंत्रण सुटलंय. ते धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करतायत. हा संपूर्ण प्रकार भाजपाच्या अंगलट आला असला, तरी त्यातून देशाची बदनामी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान प्रेषित महमंद पैगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य नुपूर शर्मा यांनी केल्यानंतर युएई, बहरीन, कतार, इराक, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी यांनी केलेले वक्तव्य निश्चितच दुर्लक्ष करण्याजोगे नाही. त्यामुळे भारताने याप्रश्नी माफी मागावी अशी मागणी या अरब देशांकडून करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे अरब देशामध्ये भारताच्या विरोधात भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांचे फोटो तेथील कचऱ्याच्या डब्ब्यावर लावण्यात येत आहेत. याशिवाय या फोटोवर बुटांचे ठसेही उमटविण्यात आले आहेत. पहिल्यांदाच भाजपाच्या चुकांची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागत आहे. या अरब राष्ट्रांकडून भारतावर माफीसाठी दबाव वाढविला जात आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *