Breaking News

ओवेसींच्या प्रस्तावावर नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, तेच लोक निमंत्रण देतील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीने मागितली तर मदत देऊ अशी तयारी दाखविली. त्यामुळे आता ओवेसी यांच्या या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टोला लगावत म्हणाले की, एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष तो पक्ष एमआयएमशी बोलेल असे स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कमी पडणारी मते जमावाजमव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून युध्दव पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परंतु एमआयएमशी अद्याप या दोघांपैकी एकानेही संपर्क साधला नाही. त्यामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज स्वतःच भाजपाच्या पराभवासाठी महाविकास आघाडीने मदत मागितली तर करू असे सांगत महाविकास आघाडीला मदत करण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी तो खोचक टोला लगावला.

एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष एमआयएमकडे बोलेन. ज्या पक्षांची त्यांच्यासोबत आहे, तेच लोक त्यांना निमंत्रण देतील. आमच्यासोबत समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडून समाजवादी पक्षाला विनंती केली जाणार आहे. एमआयएम राष्ट्रवादीकडे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच प्रत्येक छोटा पक्ष आणि अपक्ष या सर्वांशी संपर्क केला जातोय. सर्वांशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीला मतदान करा अशी विनंती केली जाणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसचे आमदार आज मुंबईमध्ये येत आहेत. त्यांना कुठे ठेवण्याची सोय केलेली आहे? मतदान करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, प्रशिक्षण देण्याची गरज नाही. फक्त मतदानाची पद्धत थोडी सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचं दोन दिवसांचे अधिवेशन झाले. त्याचा १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. योगायोगाने परवा मतदान असल्यामुळे सर्व आमदार दोन दिवस येथेच राहणार आहेत. आम्हाला काँग्रेसच्या विचारधारेची चळवळ उभी करायची आहे, त्यावरही आम्हाला चर्चा करायची आहे. त्यामुळे आम्ही सर्व आमदारांना एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्यातरी लोहगड या माझ्या निवासस्थानावर आम्ही सर्वजण राहू, अशा पद्धतीचा आता पर्यंत तरी आम्ही निर्णय घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान पाठिंब्यासाठी आमच्याकडे अद्याप महाविकास आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ असेही ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *