Breaking News

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत म्हणाले, लवकरच प्री-पेड आणि पोस्टपेड मीटर बसविणार राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनी स्थापना

लवकरच बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे प्राधान्याने प्री-पेड आणि पोस्टपेड असतील. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज उपकंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित होईल,अशी अपेक्षा आहे. स्मार्ट मीटरमुळे मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन असल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

ऊर्जा ही प्रगतीचे इंजिन आहे. या इंजिनाला गती व इंधन देण्याचे आव्हान वीज कंपनीचे कर्मचारी निश्चितपणे पार पाडतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

६ जून हा जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या दिवशी मराठी मातीत उगविलेल्या स्वराज्याच्या सुर्याने राज्याला व देशाला हजारो वर्ष पुरेल अशी ऊर्जा निर्माण केली आहे. त्याच दिवशी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांचा स्थापना दिन. ऊर्जेचा संबंध थेट प्रगतीशी असल्याने ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, या तीनही कंपन्यांसमोर आज “आर्थिक आरोग्य” सुधारणे, वीज पुरवठ्याची सरासरी किंमत कमी करणे, कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करणे, शाश्वत आधारावर वाजवी दरात दर्जेदार वीज उपलब्ध करून देणे, कोळसा संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणे, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करणे, नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रमाण वाढवणे जेणेकरुन कार्बन फूट प्रिंट मोठ्या प्रमाणात कमी केली तरच या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतील आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील.

अलिकडच्या काळात प्रभावी कोळसा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च ३० ते ४० पैसे प्रति युनिटने कमी झाला आहे. महानिर्मिती वीज निर्मितीच्या विविध पर्यायांबाबत लवचिक भूमिका घेत आहोत. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याला २४ तास वीज पुरवठा व सामान्यांना स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्याला प्राधान्य दिल्या जात आहे. कृषी पंप धोरणांतर्गत राज्यातील शेतक-यांचा एक तृतियांश थकबाकी माफी करण्याचे ऐतिहासिक काम केले असून नियम व निकषांनुसार सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला तर या शेतक-यांना सुमारे ३० हजार कोटींच्या वीज बिल माफी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात इतर गुंतवणूक दार मोठया प्रमाणात यावेत, त्यांनी गुंतवणूक करावी व इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी विभाग कटीबद्ध आहे. स्वितर्झलॅण्ड येथील परिषदेत सहभागी होत ५४ हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रासाठी आणली आहे. यातील ४ हजार कोटी हे केवळ विर्दभासाठी असणार आहेत. अपारंपारीक ऊर्जा हे नवीन उद्योजकांसाठी मोठे दालन म्हणून उपलब्ध होणार आहे. थोडक्यात देशी परदेशी गुंतवणूक दारांना जास्तीच जास्त सोई सुविधा देण्यासाठी ऊर्जा विभाग सिध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील उद्योगजकांनी इतर राज्यांबरोबर स्पर्धात्मक राहण्यासाठी त्यांना वाजवी वीज दर व इतर सोई सुविधा देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देत डॉ. नितीन राऊत यांनी व्यवसायीक, औदयोगिक, घरगुती व कृषी वीज पंप ग्राहकांना तसेच उद्योगांना इतर राज्यांपेक्षा स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज मिळावी यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महावितरण व महानिर्मितीचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *