Breaking News

मुख्यमंत्री पदावरून विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नागरीकशास्त्राची जाण असेल… मी लोकसभेला तिकीट मिळावं म्हणून विनंती करणार

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशा पध्दतीची वक्तव्य होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी फारच सावध भूमिका घेत पक्षाकडून पुढील वेळीही बारामती लोकसभा मतदारसंघातून मला तिकिट मिळावे असे हात जोडून म्हणाल्या. तसेच आपल्याला नागरिक शास्त्राची जाण असेल असे सूचक वक्तव्यही केले.

चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील प्रश्नाबरोबरच थेट त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का या प्रश्नावरही उत्तरं दिली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळेंनी दिलेल्या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. चंद्रपुरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळेंच्या या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी चर्चा केली. सुळे यांचे जोरगेवार समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

जोरगेवार यांच्या मातोश्री ‘अम्मा’ यांची सुळे यांनी भेट घेत चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी राबविलेल्या विविध कल्पक योजनांची माहिती करून घेतली. त्यांना ताडोबाला कधी येणार असं विचारलं. त्यावर मी ताडोबाला आता नाही येणार पण चंद्रपूरला येणार आहे असं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की माझ्या घरी यावं लागले. मी १०० टक्के येणार असं सांगितलं होतं. त्यानुसार मी ‘अम्मांना’ भेटायला आले आणि त्यांच्या अम्मा का डब्बा प्रकल्पाच्या प्रेमात पडले. एका कतृत्वान आईने शून्यातून सगळं उभं केलं. त्यांनी सुरु केलेला हा डब्बावाला प्रकल्प फारच सुंदर असून मी त्यांच्या कामाच्या प्रेमात पडलेय इतकं छान काम सुरु असल्याच्या त्या म्हणाल्या.

तुम्ही महिलांना भेटत आहात, त्यांच्यासंदर्भातील कार्यक्रम राबवत आहात. आम्हाला कधी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला पहायला मिळेल?, असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी, एक तर मी लोकसभा लढतेय. तुम्हाला नागरिकशास्त्राची जाण असेल. २०२४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला एवढीच विनंती करीन की मला बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तिकीट द्यावं असे सांगत हात जोडले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *