Breaking News

अमृता फडणवीस यांचे पुन्हा गाळलेल्या जागा भराचे ट्विट, शिवसेनेवर निशाणा मुंबईतील रस्त्यावरून टीका

राज्यातील आता पर्यतच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींपेक्षा सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने समाज माध्यमावर काहीतरी लिखाण करत असतात. त्यातून बऱ्याचवेळा नव्या वादाला जन्म देतात तर कधी वाद ओढवून घेतात. तर कधी त्या राजकिय टीका टिप्पणी करून चर्चेत येतात. आज अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नेटकऱ्यांना रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायला सांगितला आहे. याशिवाय त्यांना एक ऑफर देखील दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वत:चा एक विचार करत बसलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले “रिक्त स्थान भरें; आज मैं _

१. Corona positive पाई गई हूँ ..

२. एक दुख भरा प्रेम गीत लिख रही हूँ ..

३. बरसात से पहले, #mumbai की सड़कों का मुआइना करने का Plan बना रही हूँ .. सहीं जवाब चुनने वालो को मिलेगा like ” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

अमृता यांनी सोशल मीडियावर मंडे मोटिव्हेशन म्हणतं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी “आज मी_”, असं म्हणत लोकांना पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. पहिला पर्याय मी कोरोना पॉजिटिव्ह आहे. दुसरा पर्याय मी एक दु:खी प्रेमगीत लिहित आहे. अमृता यांनी ही मंडे ऑफर देताना महाविकास आघाडीवर टीकेची संधी सोडलेली नाही. तिसरा पर्याय, पावसाळ्याच्या आधी मुंबईच्या रस्त्यांचा आढावा घेत आहे, असे पर्याय त्यांनी दिले आहेत.

अमृता यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना वाटत असलेले पर्याय सांगितले आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘बरसात से पहले, #mumbai की सड़कों का, मुआइना करने का Plan बना रही हूँ..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तीन नंबरचे chances जास्त दिसत आहेत… एक आणि दोन तर कमेंन्टमध्ये लिहू पण वाटत नाहीत.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मॅम, कृपया दुसरा पर्याय नका निवडू’

Check Also

नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाने दिली “या” गोष्टीसाठी परवानगी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील …

Leave a Reply

Your email address will not be published.