Breaking News

काँग्रेस म्हणते, शिंदे-फडणवीसांना मोदींचा वाढदिवस लक्षात पण स्वातंत्र्यसैनिकांचा विसर मराठवाड्यासह कुठेच दिसली नसल्याचे सचिन सावंत यांचे ट्विट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आजच ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथेप्रमाणे या दिवशी मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याकडून औरंगबाद किंवा मराठवाड्यात दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जायचे असल्याने त्यांनी अवघे १५ मिनिटे औरंगाबादेत हजेरी लावत तेलंगणा राज्यात निघून गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद आणि नांदेड येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यातच राज्य सरकारकडून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवड्याची पूर्ण पान जाहिरात दिली. मात्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात मराठवाड्यासह कुठेही दिसली नाही अशी खरमरीत टीका ट्वीट करत सावंत यांनी याचा निषेध केला. नेत्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा विसर पडल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद, नांदेडमध्ये विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम यंदा सकाळी नऊऐवजी सात वाजताच आटोपण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर ते हैदराबादमधील एका कार्यक्रमासाठी रवाना झाले. याच मुद्द्यावरुन दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत शिवसेनेने औरंगाबादमध्ये पुन्हा ध्वजारोहण केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जातात, अशा शब्दात शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले.

दानवेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुठे राजकारण करायचे हे विरोधकांनी ठरवले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. विरोधी पक्षांना घोषणाबाजी शिवाय दुसरे कुठले काम नाही, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *