Breaking News

Tag Archives: sachin sawant

एटीएसला दिलेला DVR परमबीर सिंग यांच्या कार्यालयाने परत का मागून घेतला? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी परमबीरसिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा DVR गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसापासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्यामागे परमबीरसिंह यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल …

Read More »

गुजरातमध्ये तर अधिकाऱ्यांनी शाह आणि मोदींच्या विरोधात तक्रार केली होती भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नयेः सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी या देशामध्ये प्रशासकीय अधिका-यांनी राजकीय नेतृत्वाला पत्र लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ आहे का? गुजरातचे माजी डीआयजी डी. जी. वंजारा यांनी पत्र लिहून गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री व देशाचे विद्यमान गृहमंत्री यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून अमित शाह हे पोलीस दलाचा गैरवापर करून दुस-यांसाठी खड्डे खोदत आहेत. असे म्हटले होते त्यावेळी …

Read More »

हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे! देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत?

मुंबई: प्रतिनिधी अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा …

Read More »

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

केंद्राची स्पष्टोक्ती, आरक्षण कायदा करण्याचा अधिकार राज्यांना नाही मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राज्यांना आरक्षण कायदा करण्याचा अधिकार नसल्याची स्पष्टोक्ती सॉलिसिटर जनरल के.के.वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्याने राज्यातील मराठा समाजाला देण्याविषयीचा राज्य सरकारने केलेला कायदाच बेकायदेशीर ठरला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आता मिळणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ? इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते …

Read More »

ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे …

Read More »

राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबईः प्रतिनिधी आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका …

Read More »

जनतेने राम मंदिर ट्रस्टलाच आपला निधी जाईल याची काळजी घ्यावी रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा! - सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या …

Read More »

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा ! गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली काँग्रेसने केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत …

Read More »