Breaking News

अरविंद सावंत म्हणाले, नवा धंदा आमच्याकडे या अन पावन व्हा टक्केवारीच्या वसुलीच्या चौकशीवरून लगावला टोला

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या नादात भाजपा नेत्यांकडून आता आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवित आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांत फॉक्सकॉनबरोबर चर्चा सुरु असताना टक्केवारी मागितल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि शेलार यांना खोचक टोला लगावला.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार करताना म्हणाले, “आपले ठेवायचे झाकून…” असे म्हणत राफेल विमान खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली. सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या आणि पावन व्हा, असा लाँड्रीचा धंदा तुम्ही सुरू केला. भ्रष्टाचारावर बोलण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार आहे का? असा सवालही केला.

शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणारे सरकार आहे. मराठी माणसाच्या मुळावर उठलेले हे सरकार असंवैधानिक पद्धतीने बनले आहे. अनैतिकता शरिरात भिनली असल्याने हे लोक खोटे सहजासहजी बोलतात असे ट्वीट करत सावंत यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केले. राज्याचे उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या सत्ताकाळात २ जी, ३ जी व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा भ्रम भाजपाने निर्माण केला होता, विमान आणि संरक्षण क्षेत्रात ज्यांनी काम केले नाही, त्यांना नागपुरात हजारो एकर जमीन दिली गेली. याबाबत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होण्याचा निर्णय आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच झाला होता. हा प्रकल्प राज्यात यावा, यासाठी आम्ही निकराचे प्रयत्न केले. मात्र, यासाठी ज्यांनी काहीच केले नाही, ते आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत, असे प्रत्युत्तर दिले.

Check Also

विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…

गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *