Breaking News

Tag Archives: ashish shelar

राज्य सरकारतर्फे यंदापासून महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेतून नवे उदयोन्मुख कलाकार उदयाला येतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, विश्वासघाताच्या राजकारणामुळेच शरद पवारांना हद्दपार केलं अमित शाह यांच्यावरील शरद पवार यांच्या टीकेला उत्तर

विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

भाजपा महाअधिवेशनात मतदारांनी महायुतीला साथ दिल्याबद्दल मतदारांचे अभिनंदन शिर्डीतील एक दिवसीय महाअधिवेशनात केला ठराव मंजूर

विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी याबाबतचा ठराव मांडला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध… माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत १०० दिवसांच्या कामांचे नियोजन सादर

महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यासाठी सर्व विभागांकडून तत्काळ अधिकृत माहिती उपलब्ध करुन घ्यावी. शासनाकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती साठविण्यासाठी क्लाऊड सेवेचा उपयोग करावा. तसेच नागरिकांना सर्व योजनांची आणि लाभांची घरपोच सेवा उपलब्ध होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरिकांना सर्व …

Read More »

एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरण व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती

एन डी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मंत्रालयात एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान …

Read More »

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश

पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्‍टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम …

Read More »

आशिष शेलार यांचे निर्देश, महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा १० हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज विभागाला देत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १५ वर्षे झालेली १३ हजार वाहने भंगारात काढा पुढील १०० दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

चित्रिकरणाच्या परवानग्याना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा ! सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे आदेश

चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती व्हावी, त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे व सुसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार …

Read More »

शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित

दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात …

Read More »