Breaking News

Tag Archives: ashish shelar

मुंबई भाजपाकडून वाघ नखांच्या निमित्ताने “शंखेखोराचा कोथळा काढण्यासाठी” मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल …

Read More »

मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी बांधणार ४० हजार शौचालये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची …

Read More »

या चार मानाच्या श्री गणेशांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन चारही ठिकाणी सत्कार स्विकारत घेतले दर्शन

महाराष्ट्रात सध्या गणेशोस्तव धुमधडाक्यात सुरु आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खास मुंबईच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांसह आले. मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर मुंबईतील वैशिष्टेपूर्ण असलेल्या मानाच्या चार गणरायांचे दर्शन सत्कार स्विकारत घेतले. जाणून घेऊ या गृहमंत्री अमित शाह यांनी कोणकोणत्या गणरायाचे दर्शन घेतले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना….? हिंगोलीतील सभेतील उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, जपानच्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या गुंतवणूकीची शक्यता मला देण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी महाराष्ट्राचा गौरव

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी, प्रांतांचे …

Read More »

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद पुस्‍तकरुपात मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत पुस्‍तकाची घोषणा

भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद मराठीतील ख्‍यातनाम कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केला असून त्‍याचे पुस्‍तक लवकरच प्रकाशि‍त करण्‍यात येईल, अशी घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी कवी गीतकार प्रा. …

Read More »

नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची चौकशी होणार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक …

Read More »

बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्याच्या विरोधात नवा कायदा आणणार विधानसभा अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनिल …

Read More »

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »