Breaking News

Tag Archives: Vedanta Foxconn

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती …

Read More »

नाना पटोले यांची सूचना, वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी…

महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमी कंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून विनायक राऊत म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचा धंदा प्रकल्प गुजरातला नेल्याचे राज ठाकरेंकडून समर्थन

मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या समर्थनावर अजित पवार म्हणाले, त्याचे समर्थन करत असेल तर दुर्दैवी गुजरातमध्ये उद्योग जाण्याचे राज ठाकरेंकडून समर्थन

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. त्याचबरोबर तेलंगणामध्येही गेले. या उद्योग जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून …

Read More »

छगन भुजबळांचा उद्योग मंत्र्यांना प्रश्न, निवडणूका झाल्या; गुजरातला गेलेले उद्योग परत येणार का? राहुल नार्वेकर यांचा टोला, भुजबळ साहेब आता काय अभिनंदनाचा ठराव मांडणार का?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क, ड्रग्ज पार्क सारखे मोठे प्रकल्प गुजरातला नेल्यावरून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आकाशपाताळ एक करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी हा प्रश्न विधानसभेत महाविकास आघाडीतील माजी मंत्री छगन भुजबळ …

Read More »

उदय सामंत यांची घोषणा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी नि. न्यायाधीशामार्फत चौकशी

नुकतीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र पाठविल्याचा पुरावाच जाहिर केला. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांताच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी बैठक घेतली आणि का घेतली असा सवाल करत या बैठकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, फडणवीसांच्या त्या बैठकीनंतरच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र लिहिल्याचे दाखविले जाहिर

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जवळपास चार मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प शिंदे-फ़डणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतरच गेल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातून गुजरात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

अतुल लोंढेंचा आरोप, फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे. पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात …

Read More »

उदय सामंताच्या पत्रकार परिषदेसाठी एमआयडीसीची अशीही तत्परता? माहितीच्या अर्जावर काही तासात उत्तर

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आणि राज्यातील कोणत्याही शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला तर किमान १५ ते ३० दिवसात कधी उत्तर मिळाल्याचा अनुभव कदाचीत विरळाच असेल. मात्र राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांना घ्यावयाच्या पत्रकार परिषदेसाठी तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने एमआयडीसी विभागाने माहिती अधिकारात तात्काळ माहिती …

Read More »

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना ओपन चॅलेंजः डिबेटला या वेदांता फॉक्सकॉनविषयी उपमुख्यमंत्र्यांची खोटी माहिती; आदित्य ठाकरेंनी पुराव्यासह खोटारडेपणाचा बुरखा फाडला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उद्योग विभागाबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवर आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. खरं तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणं अपेक्षित …

Read More »