Breaking News

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना ओपन चॅलेंजः डिबेटला या वेदांता फॉक्सकॉनविषयी उपमुख्यमंत्र्यांची खोटी माहिती; आदित्य ठाकरेंनी पुराव्यासह खोटारडेपणाचा बुरखा फाडला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उद्योग विभागाबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवर आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. खरं तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणं अपेक्षित होतं. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चालेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा इलेक्ट्रॉनिक हब उद्योग उभारला आहे.वेदांत, फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण दीड लाख कोटींपेक्षा मोठा प्रकल्प दोन हजार कोटींचा असतो हे मला माहीत नाही, असा उपहासात्मक टोला लगावला.

आदित्य ठाकरे यांनी पुढे फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा खोटा बुरखा पुराव्यासह फाडला. उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता, महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा प्रयत्न होत आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

टाटा एअर बस प्रकल्पात सरकारचे म्हणणे आहे की, टाटाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण चांगले नव्हते, त्यामुळे गुंतवणूक निघाली. तर फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा.

केवळ उद्योगमंत्र्यांशीच नव्हे, तर नितीन गडकरीजींनीही या प्रकरणी पत्रव्यवहार केला आहे, सरकारनेही पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आपल्या उणिवा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे हात दाखवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला. याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेम्बडी पोरं म्हटलं, हे अत्यंत चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

वेदांता फॉक्सकॉन टाईमलाईन
वेदांता फॉक्सकॉन ५ जानेवारी २०२२
वेदांताने केंद्र सरकारने अप्रुव्हल दिले.
१९ जानेवारी रोजी देसाई साहेबांचे पत्र अग्रवाल यांना.
फेब्रुवारी २४ रोजी साईट विसिट तळेगावला.
३ मे फॉक्सकॉनची तळेगाव साईट विसिट
६ मे मी, देसाई साहेब आणि वेदांताची बैठक
२४ मे दावोसला अनिल अग्रवाल साहेबांची भेट
आम्ही महाराष्ट्रात येण्याची विनंती केली.
२४ जून फॉक्सकॉनच्या लोकांची आमची दिल्लीत भेट
सरकार पडले.
शिंदेंनी फॉक्सकॉनला पत्र लिहिले.
१० हजार पेक्षा अधिक सबसिडी मविआने दिली गुजरात पेक्षा अधिक.
मग २०२१ सालीच ते जाणार होते तर २०२२ साली ज्या बैठका झाल्या त्याचे काय?

Check Also

न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना या अटी व शर्तीवर १ जून पर्यंत अंतरिम जामीन

सर्वोच्च न्यायालयाने १० मे (शुक्रवार) रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *