Breaking News

शरद पवार रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राज्यातील वातावरण तप्त झाले असतानाच महाविकास आघाडीमधील महत्वाचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजपासून तीन दिवस ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल राहणार असले तरी ४ नोव्हेंबर पासून शिर्डीत होत असलेल्या दोन दिवसीय पक्षाच्या शिबिराला मात्र हजेरी लावणार आहेत .

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातसह इतर राज्यात वळविण्यात आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला आहे . काँग्रेस -राष्ट्रवादी व शिवसेनेकडून राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे केले जात असतानाच हे प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच अन्य राज्यात गेल्याचे आरोप भाजपाकडून केले जात आहेत. अशा अटीतटीच्या प्रसंगात महाविकास आघाडीचे भक्कम आधारस्तंभ असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून सलग तीन दिवस रुग्णालयात दाखल असणार आहेत.

प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी पवार यांना तीन दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर ते मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णायात आजपासून दाखल झाले आहेत. २ तारखेला त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या येत्या ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे आयोजित दोन दिवसीय शिबिरासाठी पवार ३ नोव्हेंबर रोजी शिर्डीत दाखल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *