Breaking News

Tag Archives: Vedanta Foxconn

देवेंद्र फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल, उद्योजक म्हणाले राज्यात औद्योगिक वातावरण नाही

मागील काही दिवसांपासून राज्यातून उद्योग जाण्यावरून एकप्रकारच्या खोट्या कथा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी उध्दव ठाकरे गट आणि एचएमव्ही पत्रकारांकडून अर्थात हिज मास्टर्स व्हॉइस (अर्थात त्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावरून) हे काम सुरु आहे. जे उद्योग राज्यातून गेले ते आमच्या सरकारच्या काळात गेले नसून ते सर्व उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास …

Read More »

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …

Read More »

उदय सामंत यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, वेदांतबद्दल समजू शकतो पण एअर बस.. तुमच्यापासून दूर गेलो म्हणून इतका वाईट झालो का?

वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आज शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा …

Read More »

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

केंद्रीय मंत्री मांडवीय यांचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, आणखी एक प्रकल्प गेला शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटच्या आधारे केली माहिती उघड

राज्यातील दिड लाख कोटी रूपयांचा वेदांत फॉक्सकॉन हा सेमिकंडक्टर बनविण्याचा आणि लाखभर तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग गुजरातला गेला. त्यापाठोपाठ बल्क ड्रग प्रकल्पही राज्याबाहेर गेला. या दोन प्रकल्पावरून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच महाराष्ट्रातून आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे वास्तव शिवसेना नेते आदित्य …

Read More »

आदित्य ठाकरेंना भाजपाने पाच प्रश्न विचारत दिले आव्हान, आधी प्रकल्पाची जागा दाखवा

घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी …

Read More »

निर्मला सीतारामन यांनी पुणे दौऱ्यात वेदांता फॉक्सकॉनच्या प्रश्नाला दिली बगल ज्या प्रकल्पांना विरोध केला त्याचा गुजरातला कोणता फायदा होणार होता

राज्यात तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नाणार प्रकल्प थांबविणारे लोक आता बोलत आहेत. हे सगळे हजारो कोटींचे प्रकल्प राज्याच्या हिताचेच होते. मुंबईमधील आर कारशेडला विरोध करणारे कोण आहेत ? या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्पाच्या …

Read More »

वेदांत-फॉक्सकॉन नंतर आता मोठ्या ऑनलाईन कपंनीने गुंडाळला महाराष्ट्रातून गाशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केली त्या कंपनीची जाहिरात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा ठरणारा तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगलेला असतानाच आता महाराष्ट्रातून आणखी एका मोठ्या ऑनलाईन कंपनीने गाशा गुंडाळत थेट कर्नाटकात गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुंबईतल्या प्रकल्पासाठी चेन्नईत का मुलाखती? सात वर्षे एमएसआरडीसीचे मंत्री असलेल्यांनी उत्तर द्यावे

वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या देशात चित्ते आले ठिक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हे ही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे …

Read More »