Breaking News

वेदांत-फॉक्सकॉन नंतर आता मोठ्या ऑनलाईन कपंनीने गुंडाळला महाराष्ट्रातून गाशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केली त्या कंपनीची जाहिरात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा ठरणारा तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगलेला असतानाच आता महाराष्ट्रातून आणखी एका मोठ्या ऑनलाईन कंपनीने गाशा गुंडाळत थेट कर्नाटकात गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या एका नोटीसीच्या आधारे ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर ‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही लक्ष्य केले.

‘फोन-पे’ डेबिटेड फॉर्म महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक’ या मथळ्याखाली रोहित पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. रोहित यांनी एका चारोळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. ‘वेदान्त’नंतर ‘फोनपे’ची बारी… गब्बर होतायेत शेजारी… महाराष्ट्र पडतोय आजारी… व्वा रे सत्ताधारी’ अशी चारोळीही रोहित यांनी या नोटीसच्या फोटोसोबत पोस्ट केली आहे. तसेच महाराष्ट्र सर्वाधिक कर देणारं राज्य असूनही येथील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचं सांगताना,” टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे… महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे” असं रोहित यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्यावतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

त्याचबरोबर, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते, असेही या जाहिरातीत सांगण्यात आले.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आता कर्नाटकला हलवण्यात येणार असल्याने यासंदर्भातील ही सूचना गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे.

Check Also

रोहित पवार यांची टीका, फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटीवर का नाही ?

कर्जत जामखेड मतदार संघामधील एमआयडीसीचा मुद्दा मी अधिवेशनात मांडल्यानंतर आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *